NVS Class 6 Question Paper: English, Hindi, Bengali, Marathi
Navodaya Question Paper: Jawahar Navodaya Vidyalaya selection test (JNVST) is held every year in definite time for the admission of class VI and class IX students. Both students and their parents wait eagerly to know details about the JNVST exam. The JNVST board has already shared information about JNVST books to help candidates in exam preparation. Students can follow Navodaya Vidyalaya entrance exam preparation books to get an overall idea about the exam and its question pattern so that they can prepare accordingly. Students should also follow previous year question papers of JNVST to get complete knowledge and analyse their preparation level. In this article, aspirants will get all information regarding Navodaya Question Paper for their upcoming class VI and class ix entrance examination. Question papers are prepared in all regional languages (i.e. English, Hindi, Marathi and Bengali) so candidates can choose and practice with their preferable language for question paper.
Candidates expect the best study materials and model question papers as the exam is coming near for this year. So, it is our responsibility to deliver them the right and helpful resources with which they can achieve great score as per their expectations. With the perfect preparation they will be able to perform well in JNVST and fulfill their dream of enrolling in the institute. From the JNVST previous year questions students will get the idea of an actual exam which will enhance their confidence. Students have reached the right source where they will find out JNVST question papers in all regional languages (English, Hindi, Marathi and Bengali etc.) for both solved and unsolved formats. JNVST question papers will be objective type questions where students’ mental ability, arithmetic test and language test will be measured. Students must give much time in the mental ability section as it carries full marks and maximum questions are formed form this part. So, students are advised to follow all previous year question papers and continue their exam preparation effectively. By practicing with question papers they will understand the needed areas in their preparation through their strength and weak area in different subjects. The most useful factor is that students can choose any regional language as per their states within India including national language and English in common.
Question Paper in English
Navodaya Class 6 Question Paper in English |
|
Year 2017 |
Download |
Year 2018 |
Download |
Year 2019 |
|
Year 2020 |
Download |
Year 2021 |
Download |
Year 2022 |
Navodaya Class 6 Question Paper in Hindi
Navodaya Class 6 Question Paper in Hindi |
|
Year 2017 | |
Year 2018 |
Math, Language |
Year 2019 | |
Year 2020 |
Math , Language |
Year 2021 |
Download |
Year 2022 |
Question Paper in Marathi
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
विभाग : मानसिक क्षमता चाचणी (प्रश्न 1 ते 50 )
भाग –I
सूचना : प्रश्न क्र. 1 ते 5 मध्ये, डाव्या बाजूस एक प्रश्नआकृती आहे आणि 1, 2, 3, 4 असे क्रमांक दिलेल्या चार उत्तरआकृत्या उजव्या बाजूस दिल्या आहेत. XY च्या जागी आरसा धरला असता आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे हुबेहूब दिसणारी उत्तरआकृती सांगा. तुम्ही निवडलेल्या उत्तरआकृतीचा क्रमांक प्रश्नाच्या क्रमांकासमोरील चौकटीत लिहून तुमचे उत्तर दर्शवा :
भाग– II
सूचना: प्रश्न क्र. 6 ते 10 मध्ये, डाव्या बाजूच्या प्रश्नआकृत्यांमध्ये दाखवल्याप्रमाणे एक कागदाचा तुकडा घड्या घालून छिद्रान्वित केलेला आहे. उजव्या बाजूस 1, 2, 3, 4 हे क्रमांक टाकलेल्या चार उत्तरआकृत्या आहेत. कागद उघडल्यावर (घड्या सोडवल्यावर ) जसा दिसेल त्याप्रमाणे दिसणारी उत्तरआकृती निवडा. तुम्ही निवडलेल्या उत्तरआकृतीच्या क्रमांकाने प्रश्नाच्या क्रमांकासमोरील चौकटीत तुमचे उत्तर दाखवा :
भाग– III
सूचना : प्रश्न क्र. 11 ते 15 मध्ये, डाव्या बाजूस एक प्रश्नआकृती दिलेली आहे आणि 1, 2, 3, 4 असे क्रमांक टाकलेल्या चार उत्तरआकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. प्रश्नआकृतीमधील तुकड्यांपासून बनवता येईल अशी उत्तरआकृती शोधून काढा व तुमचे उत्तर केवळ इंग्लिश अंकामध्ये (म्हणजे 1, 2, 3, 4) प्रश्नाच्या क्रमांकाच्या समोरील चौकटीत लिहा :
भाग– IV
सूचना : प्रश्न क्र. 16 ते 20 मध्ये, डाव्या बाजूस एक प्रश्नआकृती दिलेली आहे आणि 1, 2, 3, 4 असे क्रमांक टाकलेल्या चार उत्तरआकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. जिच्यामध्ये प्रश्नआकृती दडलेली/दडवलेली आहे अशी उत्तरआकृती निवडा आणि तुमचे उत्तर केवळ इंग्लिश अंकामध्ये (म्हणजे 1, 2, 3, 4 ) प्रश्नाच्या क्रमांकासमोरील चौकटीत लिहा :
भाग – V
सूचना : प्रश्न क्र. 21 ते 25 मध्ये, प्रत्येक प्रश्नात 1, 2, 3 आणि 4 अशा चार आकृत्या दिले आहेत. या चार आकृत्यांपैकी, तीन आकृत्या कोणत्यातरी मार्गाने सारख्या आहेत आणि आकृती वेगळी आहे. वेगळी असलेली आकृती निवडा आणि तुमचे उत्तर केवळ इंग्लिश अंकाण (म्हणजे 1, 2, 3, 4 ) प्रश्नाच्या क्रमांकासमोरील चौकटीमध्ये लिहा :
भाग – VI
सूचना : प्रश्न क्र. 26 ते 30 मध्ये, एक प्रश्नआकृती डाव्या बाजूस दिलेली आहे आणि 1, 2, 3, 4 असे क्रमांक टाकलेल्या चार उत्तरआकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. प्रश्नआकृतीप्रमाणे हुबेहूब असणारी उत्तरआकृती निवडा आणि तुमचे उत्तर फक्त इंग्लिश अंकामध्ये (म्हणजे 1, 2, 3, 4 ) प्रश्नाच्या क्रमांकासमोरील चौकटीमध्ये लिहा :
भाग – VII
सूचना : प्रश्न क्र. 31 ते 35 मध्ये, डाव्या बाजूस एक प्रश्नआकृती आहे, जिचा एक भाग गायब आहे. उजव्या बाजूच्या 1, 2, 3, 4 या उत्तरआकृत्यांचे निरीक्षण करा आणि अशी उत्तरआकृती शोधून काढा की जी दिशा न बदलता प्रश्नआकृतीच्या गायब भागाच्या जागी बरोबर बसेल आणि प्रश्नआकृतीची रचना पूर्ण करील. तुम्ही निवडलेल्या उत्तरआकृतीचा क्रमांक प्रश्नाच्या क्रमांकासमोरील चौकटीत लिहून तुमचे उत्तर दर्शवा :
भाग – VIII
सूचना : प्रश्न क्र. 36 ते 40 मध्ये, डाव्या बाजूस तीन प्रश्नआकृत्या आहेत आणि चौथ्या आकृतीची जागा रिकामी सोडलेली आहे. प्रश्नआकृत्या एका मालिकेमध्ये बसवलेल्या आहेत. डाव्या बाजूची रिकामी जागा भरून काढून मालिका पूर्ण करील अशी आकृती उजव्या बाजूच्या उत्तरआकृत्यांमधून शोधून काढा. तुम्ही निवडलेल्या उत्तरआकृतीच्या क्रमांकाने प्रश्नाच्या क्रमांकासमोरील चौकटीत तुमचे उत्तर दर्शवा :
भाग- IX
सूचना प्रश्न क्र. 41 ते 45 मध्ये, प्रत्येकी दोन प्रश्नआकृत्यांच्या दोन जोड्या आहेत. दुसऱ्या जोडीत. एक प्रश्नचिन्ह (?) आहे. पहिल्या दोन प्रश्नआकृत्यांमध्ये एक विशिष्ट नातेसंबंध आहे; तशाच तऱ्हेचा नातेसंबंध तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नआकृत्यांमध्ये असला पाहिजे. प्रश्नचिन्हाची जागा घेईल अशी एक उत्तरआकृती निवडा. तुम्ही निवडलेल्या आकृतीचा क्रमांक प्रश्नाच्या क्रमांकासमोरील चौकटीमध्ये लिहा :
भाग – X
सूचना : प्रश्न क्र. 46 ते 50 मध्ये, भूमितीय आकृतीचा (त्रिकोण, चौरस, वर्तुळ) एक भाग डाव्या बाजूस प्रश्नआकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूच्या 1, 2, 3, 4 या उत्तरआकृत्यांमध्ये आहे. भूमितीय आकृती पूर्ण करणारी उजव्या बाजूची आकृती शोधून काढा आणि त्या आकृतीखालील क्रमांक प्रश्नाच्या क्रमांकासमोरील चौकटीमध्ये लिहा :
सूचना : प्रत्येक प्रश्नासाठी 1, 2, 3 आणि 4 असे क्रमांक असलेली संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. त्यापै फक्त एकच उत्तर बरोबर आहे. तुम्हाला बरोबर उत्तर निवडायचे आहे आणि त्याच्या बाजूला असलेल्या पर्यायाद क्रमांक उत्तरपत्रिकेत प्रश्नक्रमांकासमोरील चौकटीत लिहायचा आहे.
प्रश्न 51 : लांबी रुंदीच्या दुप्पट असणाऱ्या आयताची परिमिती 24 सेंमी. आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती :
1) 32 मी.2
2) 128 सेंमी.2
3) 27 सेंमी.2
4) 32 सेंमी.2
प्रश्न 52.) 175% हे अपूर्णांक रूपात ——— असे लिहितात.)
1.)1 (3/ 4)
2.) 17 (5/10)
3.)1 (3/8)
4.) 17.)5 / 100
प्रश्न 53 : रु.) 800 वर दरसाल 9% दराने 12 वर्षासाठी किती व्याज मिळेल?
1.)72 रु.
2.) 198 रु.
3.) 126 रु.
4.) 144.
प्रश्न 54.) 5 मी. लांब व 3.5 मी. रुंद भिंतीवर 28 सेंमी. x 25 सेंमी. मापाचे किती कागद चिकटवता येतील
1.) 125
2.)25
3.)500
4.) 250
प्रश्न 55.) 44 + 4/1000 + 4 / 100 = किती ते दशांश अपूर्णांकात मांडा.
1.) 44.44
2.) 44.440
3.) 44.404
4.) 44.044
प्रश्न 56.) 5, 4, 9, 8 व 0 हे अंक वापरून मोठ्यात मोठी बनणारी विषम संख्या कोणती?
1.)98405
2.) 98540
3.)98541
4.) 98501
प्रश्न 57.) भागाकाराच्या एका उदाहरणात भागाकार, बाकी व भाजक अनुक्रमे 35, 45 व 50 असेल तर भाज्य संख्या कोणती असेल ?
1.) 1625
2.) 2285
3.) 1595
4.) 1795
प्रश्न 58.) 194, 305, 416 या संख्यारचनेतील पुढच्या दोन संख्या कोणत्या?
1.) 517, 628
2.) 527, 638
3.) 527, 628
4.) 506, 638
प्रश्न 59.) मुंबईहून बेळगावला जाणारी आगगाडी रात्री 8.15 वाजता सुटली व दुसऱ्या दिवशी सकाळी 9.52 ल बेळगावला पोहोचली तर आगगाडीला बेळगावला पोहोचण्यासाठी लागलेला वेळ किती ?
1.) 18 तास 7 मिनिटे
2.) 13 तास 27 मिनिटे
3.) 12 तास 37 मिनिटे
4.) 13 तास 37 मिनिटे
प्रश्न 60.) एका आयताकृती बागेची परिमिती 140 मी. असून त्यांच्या लांबीरुंदीतील फरक 10 मी. आहे, तर त्य बागेची लांबी किती ?
1.) 30 मी.
2.)40 मी.
3.)75 मी.
4.) 65 मी.
प्रश्न 61 : सोबतच्या आलेखावरून काजू व संत्र्यांच्या झाडापेक्षा आंबा, चिकू व सीताफळाची एकूण झाडे कितीने कमी अथवा जास्त आहेत ते सांगा.
1.)100 ने जास्त
2.)150 ने कमी
3.)150 ने जास्त
4.)100 ने कमी
प्रश्न 62.70 चे अवयव आहेत.-
1.)1, 2, 3, 5, 7
2.)1, 2, 4, 5, 7, 14, 70
3.)1, 2, 5, 7, 14, 70
4.)1, 5, 7, 14, 21, 70
प्रश्न 63.)1 ते 100 पर्यंतच्या दोन अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक किती वेळा येतो?
1.)20
2.)18
3.)19
4.)21
प्रश्न 64: राम, शाम व शंकरजवळ अनुक्रमे 65 सेंमी., 1 मी. व 600 मिमी. लांबीच्या काठ्या आहेत; तर त्या तिन्ही काठ्यांची सरासरी उंची किती ?
1.)70 सेंमी.
2.)75 सेंमी.
3.)222 मिमी.
4.)57 सेंमी.
प्रश्न 65 : राणीजवळ 560 रु. आहेत; किशोर व राणीजवळ असणान्या रुपयांचे गुणोत्तर 5: 8 असल्यास किशोरजवळ किती रुपये असतील ?
1.)350 रु.
2.)896.रु.
3.)450 रु.
4.)910 रु.
प्रश्न 66.): अनिलरावांनी 360 कि.ग्रॅ. ज्वारीचे 6 समान भाग करून प्रत्येक भागातील अर्धा वाटा एका व्यक्तीस, याप्रमाणे ज्वारीचे वाटप केल्यास एका व्यक्तीस किती कि.ग्रॅ.ज्वारी मिळाली ?
1.)60
2.)15
3.30
4.)120
प्रश्न 67.)75रु डझन दराने खरेदी केलेल्या 4 डझन वह्या 8 रुपयांस एक या दराने विकल्यास किती नफा होईल?
1.)84 रु.
2.)48 रु.
3.)42 रु.
4.)21 रु.
प्रश्न 68.)48, 64, 96 या संख्यांच्या लसावि व मसावितील फरक……….आहे.
1.)192
2.)176
3.48
4.)144
प्रश्न 69.)25+15 / 5+7 x 4 – 12 / 3 x 6 – 15 =?
1.)17
2.)32
3.81
4.)47
प्रश्न 70.)एक आचारी एका तासात 60 लाडू बांधतो. एका हॉटेलात त्याला दररोज 4 तास लाडू बांधावे लागतात; तर 12 दिवसांत तो एकूण किती लाडू बांधेल ?
1.240
2.)720
3.960
4.)2880
प्रश्न 71.)1500 च्या 80 % मधून 950 चे 60% वजा केल्यास किती बाकी उरेल?
1.550
2.)440
3.)630
4.)640
प्रश्न 72 ) लहानात लहान पाच अंकी संख्येतून किती वजा केल्यास मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या मिळेल ?
1.)1
2.)9991
3.)9801
4.)9001
प्रश्न 73.)खालीलपैकी कोणत्या पर्यायात संख्यांचा चढता क्रम दाखवला आहे ?
1.)4/5, 0.81, 9/10
2.) 0.81, 4/5, 9/10
3.)9/10, 0.81, 4/5
4.)4/5, 9/10, 0.81
प्रश्न 74.)राम, व शाम देवळाभोवती एक प्रदक्षिणा अनुक्रमे 40 व 50 सेकंदांत पूर्ण करतात, जर त्या सर्व जणांनी सायंकाळी 5.55 वाजता एकाच वेळी देवासमोरून प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली तर ते तिघे पुन्हा किती वाजता देवासमोर एकत्र येतील ?
1.)सायंकाळी 6 वाजता
2.)सायंकाळी 6.05 वाजता
3.)सायंकाळी 6.20 वाजता
4.)सायंकाळी 5.59 वाजता
प्रश्न 75: दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 1875 आहे. त्यापैकी एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे; तर त्यापैकी मोठी संख्या कोणती ?
1.)25.
2.)45
3.)75
4.)105
भाग तीन – भाषा
उमेदवारांसाठी सूचना
1.) भाषा या प्रश्नपत्रिकेत 76 ते 100 या क्रमांकांचे एकूण 25 प्रश्न आहेत.
2.) सुरुवात करण्यापूर्वी संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचून काढण्याची आवश्यकता नाही. पहिल्या प्रश्नापासून प्रश्न
सोडविण्यास सुरुवात करा. जर एखादा प्रश्न कठीण वाटला तर पुढचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. जर वेळ
असेल तर कठीण प्रश्न तुम्ही नंतर सोडवू शकता.
3.) प्रश्नपत्रिकेतील या विभागात पाच उतारे आहेत. प्रत्येक उताऱ्याच्या खाली पाच प्रश्न आहेत. उतारे काळजीपूर्वक
वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
4.) प्रत्येक प्रश्नाला ठळकपणे 1, 2, 3 आणि 4 अशा अंकांत चार संभवनीय उत्तरे दिलेली आहेत. योग्य ते उत्तर
निवडून उत्तराच्या बाजूला दिलेल्या पर्यायाचा क्रमांक स्वतंत्र उत्तरपत्रिकेत लिहा..
सूचना : या भागात पाच उतारे आहेत. प्रत्येक उताऱ्याच्या शेवटी पाच प्रश्न आहेत. प्रत्येक उतारा काळजीपूर्वक
वाचा आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. प्रत्येक प्रश्नासाठी 1, 2, 3 आणि 4 असे क्रमांक असलेली संभाव्य
उत्तरे दिलेली आहेत. त्यापैकी फक्त एकच उत्तर बरोबर आहे. तुम्हाला निवडायचे आहे आणि त्याच्या बाजूला
असलेल्या पर्यायाचा क्रमांक स्वतंत्र उत्तरपत्रिकेत लिहा. बरोबर उत्तर
उतारा – 1
हिमालय हा जगातील सर्वांत मोठा 5,94,400 चौ. कि. मी. क्षेत्रफळ असलेला पर्वतसमूह आहे. हिमालयाची लांबी
2,500 कि. मी. व रुंदी 200 ते 400 कि.मी. इतकी असून त्यात भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, तिबेट या
भूप्रदेशाचा समावेश आहे. या पर्वतरांगांमध्ये 8863 मी. उंचीची गौरीशंकर व 8611 मीटर उंचीची के, ह्या अत्युच्च
पर्वतरांगा आहेत. त्याखालोखाल नंगापर्यंत नंदादेवी ह्या पर्वतरांगा आहेत. यापैकी बरीच शिखरे हिमाच्छादित
आहेत. त्यामुळेच याला ‘हिमालय’ असे नाव पडले.
सुमारे पावणेचार लाख वर्षांपूर्वी भारत ज्या भूखंड पाटीवर आहे ती वर उचलली जाऊन युरेशियन भूखंड पाटीवर
आदळताना प्राचीन टेथिस समुद्रातील गाळ मुडपला जाऊन पर्वत तयार झाला, तो हिमालय. त्याच्या गर्भात
अतिप्राचीन खडक आहेत हे त्याचे वैशिष्ट्य आहे. आजही गौरीशंकरची उंची बदलत आहे. इ. स. 1852 मध्ये ती
7840 मीटर होती, तर 1987 मध्ये ती 8848 मीटर होती. हिमालयाचे उंच होत राहणे हे जोपर्यंत भारताचा भूखंड
आदळत राहील, तोवर प्रतिवर्षी साधारण 4 मि.मी. वाढ सुरूच राहील.
प्रश्न 76) हिमालयाचे क्षेत्रफळ किती आहे ?
1.) 5, 94,40,00,00,000 चौ. मी.
2.)2,500 कि.मी.
3.) 5, 49,400 चौ. कि. मी.
4.) यापैकी नाही.
प्रश्न 77.) हिमालयातील सर्वांत उंच पर्वतरांग कोणती ?
1.) नंगा पर्वत
2.) गौरीशंकर
3.) नंदादेवी
4.) K2
प्रश्न 78.) हिमालय कोणत्या खंडात आहे ?
1.) भारत
2.) युरोप
3.) आशिया
4.) युरेशियन
प्रश्न 79: ‘हिमालय‘ असे नाव या पर्वतसमूहाला का देण्यात आले ?
1.) हा पर्वत जगात सर्वांत उंच असल्यामुळे
2.) हा पर्वत बर्फाने व्यापलेला असल्यामुळे
3.) समुद्राच्या गाळापासून तयार झाल्यामुळे
4.) प्राचीन खडकापासून तयार झाल्यामुळे
प्रश्न 80.) 1987 साली गौरीशंकर या पर्वतरांगेची उंची किती होती ?
1.) 8611 मी.
2.) 8863 मी.
3.) 8848 मी.
4.) 8840 मी.
उतारा – 2
तुळशीच्या अंगणात बेहड्याचे झाड होते. एकदा श्याम तिथेच खेळत होता. तेवढ्यात झाडावरून एक चिमणीचे पिलू टपकन
खाली पडले. इवलेसे पिलू उंचावरून पडले. पार लोळागोळा होऊन गेले. श्यामने पाहिले. पिलाचे शरीर थरथरत होते. छाती
धडधडत होती. श्यामला वाईट वाटले. त्याने एका फडक्यावर ठेवून त्या पिलास घरात आणले. मऊ कापसावर ठेवले. श्याम
आणि त्याचा भाऊ पिलाची काळजी घेऊ लागले. पिलाच्या चोचीत तांदळाच्या बारीक कण्या भरवू लागले. शिंपल्याने पाणी पाजू
लागले.
पण इवलेसे पिलू घायाळ झालेले ! ते कसे खाणार-पिणार ? त्याने अखेरीस मान टाकली. श्यामला फार दुःख झाले.
प्रश्न 81.) अंगणामध्ये कशाचे झाड होते ?
1.) तुळशीचे
2.) आंब्याचे
3.) बेहड्याचे
4.) फणसाचे
प्रश्न 82.) पिलू लोळागोळा कशामुळे झाले ?
1.) खायला न मिळाल्यामुळे
2.) उंचावरून पडल्यामुळे
3.) पावाल्यामुळे
4.) दगड लागल्यामुळे
प्रश्न 83.) श्यामने पिलास कोठे ठेवले ?
1.) मऊ गवतावर
2.) चिमणीच्या घरट्यात
3.) घराच्या दरवाजासमोर
4.) मऊ कापसावर
प्रश्न 84.) श्यामने पिलास काय खाऊ घातले ?
1.) तांदळाच्या बारीक कण्या
2.) ज्वारीच्या कण्या
3.) तांदळाचे टपोरे दाणे
4.) भात
प्रश्न 85.) शेवटी त्या पिलाचे काय झाले ?
1.) मान मोडली
2.) मरण पावले
3.) उडून गेले
4.) अधू झाले
उतारा 3
आज एकूण होणाऱ्या मच्छीमारीत है मासे गोड्या पाण्यातले असतात. जगाचा भाग समुद्राने व्यापला असून जमिनीपेक्षा त्यात
प्रचंड अन्नसामग्री आहे. सागरी माशांचे 16000 ज्ञात असे प्रकार आहेत, परंतु त्यातील 200 प्रकारांचाच आपण उपयोग करून
घेत आहोत. दरसाल 2 कोटी 50 लक्ष टन मासे मानवी आहाराकरिता पकडले जातात, तरीपण तेवढे माझे जगातील निम्म्या
रहिवाशांना पुरेसे होत नाहीत. 1 एकर शेती उत्पन्नापेक्षा 1 एकर तलावातील माशांपासून खात्रीने जास्त प्राप्ती होऊ शकते.
प्रश्न 86.) गोड्या पाण्यात किती टक्के मासेमारी होते ?
1.) 80%
2.) 40 %
3.)20%
4.)5%
प्रश्न 87.) सागरी माशांपैकी किती प्रकारांचा आपण उपयोग करून घेतो ?
1.) 16000
2.) 50 %
3.) 100 %
4.) 200
प्रश्न 88.) दरवर्षी केवढे मासे पकडले जातात ?
1.) 2 कोटी 50 लक्ष टन
2.) 2 कोटी 10 लक्ष टन
3.) 2 कोटी 50 लक्ष किग्रॅ.
4.) 2 कोटी टन
प्रश्न 89.) कशापासून जास्त उत्पन्न मिळेल ?
1.) एक एकर शेतीपासून
2.) एक एकरातील झाडापासून
3.) एक एकर तलावातील माशांपासून
4.) एक एकर डोंगरापासून
प्रश्न 90.) अन्नसामग्री कोठे जास्त प्रमाणात आहे ?
1.) जंगलात
2.) तलावात
3.) शेतात
4.) समुद्रात
उतारा -4
आज लोकांना भोगाव्या लागणान्या सर्वांत मोठ्या आरोग्यविषयक समस्यांपैकी एक म्हणजे लठ्ठपणाचे वाट प्रमाण. लठ्ठपणा हा
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आहे आहार, शारीरिक हालचाली, आरोग्य आणि पोषा यांतील बदलांचा. त्याच्यामुळे हाडांची
झीज, मधुमेह, काही कर्करोग, हृदयाच्या तक्रारी आणि आत्मविश्वास जाणे व नैराश्य यांसारख्या शारीरिक समस्या उद्भवू
शकतात. त्यामुळे आपण आपली जीवनशैली बदलणे आणि त्याकरिता शारीरिकदृष्ट्या कार्यक्षम राहणे व पिष्टमय पदार्थ, प्रथिने,
स्निग्ध पदार्थ आणि जीवनसत्वे, खनिजे समृद्ध असा संतुलित आहार घेणे अनिवार्य आहे. लोकांच्या सवयी, आवडीनिवडी,
जीवनशैली आणि कामाचे स्व यांचा विचार करून त्यांच्या आहाराचे नियोजन करण्यासाठी प्रशिक्षित आहारतज्ज्ञ त्यांना मदत
करू शकतात.
प्रश्न 91.) लेखकाच्या मते, लठ्ठपणा आहे
1.) रोग
2.) एक जीवनशैली
3.) एक अॅलर्जी
4.) मनाची समस्या
प्रश्न 92.) लठ्ठपणाच्या समस्येपासून खालीलपैकी कोणत्या लोकांना कमी त्रास होणे अपेक्षित आहे ?
1.) हॉटेलमध्ये व उपाहारगृहात खाणारे लोक
2.) ऑफिसात दीर्घकाळ काम करणारे लोक
3.) वातानुकूलित वातावरणात राहणारे लोक
4.) खूप खेळ खेळणारे क्रीडापटू व खेळाडू
प्रश्न 93.) पिष्टमय पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे हे सगळे प्रकार आहेत
1.) औषधांचे
2.) रसायनांचे
3.) अन्नाचे
4.) टॉनिक्सचे
प्रश्न 94.) आहारतज्ज्ञ म्हणजे अशी व्यक्ती, की जी
1.) लोकांना वजन कमी करण्यासाठी योग्य प्रकारचे व्यायाम शिकवते.
2.) कोणते अन्न खावे, याविषयी आपल्याला सल्ला देते.
3.) वेगवेगळ्या रोगांवर उपचार करते.
4.) ज्यांना वजन कमी करायचे आहे, अशा लोकांकरिता कमी स्निग्ध अन्न शिजवते.
प्रश्न 95.) लोकांना आपली ‘जीवनशैली’ बदलण्याचा सल्ला लेखक देत आहे. हा बदल पुढील प्रकाराने शक आहे
1.) शहरांतून खेड्यात स्थलांतर करणे.
2.) वातानुकूलित गाडीतून जाण्याऐवजी चालत ऑफिसला जाणे..
3.) आजारी पडल्यावर डॉक्टरना पैसे देता यावेत म्हणून जास्त काटकसर करणे.
4.) आपल्या आहारपद्धती बदलणे व जास्त व्यायाम करणे.
उतारा -5
ऑलिम्पिकमध्ये भारतीय कसरतपटूंना अडखळताना पाहणे, ही एक निराशाजनक सामान्य गोष्ट होऊन बसह आहे. जगातील
सर्वात महान क्रीडा महोत्सवातून केवळ एक पदक घेऊन येणे, ही थोडक्यात सांगायचे हृदयविदारक गोष्ट आहे. योजनाबद्धता,
पुरेशा प्रशिक्षण सवलती आणि परदेशी वातावरणाचा परिचय यांचा अभ हे भारतीय क्रीडाचमूच्या निरस प्रदर्शनाचे घटक मानता
येतील. प्रतिभेच्या बाबतीत असे म्हणता येईल की, ति काही वानवा नाही. दहा कोटींहून अधिक लोकसंख्या असल्यावर प्रतिभा
सापडण्यासाठी धावाधाव करावी लाग नाही, मग लाख रुपयांचा प्रश्न असा उठतो की, ऑलिम्पिकच्या रंगमंचावर या प्रतिभेचे
काय होते ? तर एकच स्पष्टीकरण असू शकते की, पैसा अथवा त्याचा अभाव हेच भारताच्या दुःखभरल्या कहाणीचे मूळ का
आहे.
प्रश्न 96.) उतायात वापरलेल्या ‘निराशाजनक’ शब्दाचा अर्थ आहे-
1.) चिंताजनक
2.) त्रासदायक
3.) दुःखकारक
4.) भयावह
प्रश्न 97.) खालीलपैकी कशाच्या संदर्भात परिच्छेदात ‘सर्वांत महान क्रीडा महोत्सव’ असा उल्लेख आलेला आहे ?
1.) पुरेसे प्रशिक्षण
2.) क्रीडा कार्यक्रम पाहणे
3.) ऑलिम्पिक
4.) पदके जिंकणे
प्रश्न 98.) भारतीय क्रीडापटूंच्या अपयशाची कोणती कारणे उताऱ्यात सांगितलेली आहेत ?
1.) योजनाबद्धता, पुरेशा प्रशिक्षण सवलती आणि परदेशी वातावरणाचा परिचय यांचा अभाव
2.) खाण्याच्या सवयी, पुरेशा प्रशिक्षण सवलती आणि योजनाबद्धतेचा अभाव
3.) परदेशी वातावरणाचा परिचय, प्रशिक्षणाच्या पद्धती आणि पुरेशा प्रशिक्षण सवलती
4.) प्रशिक्षणाच्या वेळा, योजनाबद्धतेचा अभाव आणि परदेशी वातावरणाचा परिचय
प्रश्न 99.) लाख रुपयांचा प्रश्न’ या शब्दांचा अर्थ आहे –
1.) ज्याचे उत्तर दिल्यावर लाख रुपये मिळतील असा प्रश्न
2.) सर्वांत महत्त्वाचा आणि वाजवी प्रश्न
3.) लाख रुपये किमतीचा प्रश्न
4.) ज्याचे उत्तर देण्यासाठी लाख रुपये द्यावे लागतील असा प्रश्न.
प्रश्न 100.) ऑलिम्पिकच्या रंगमंचावर भारतीय प्रतिभेच्या अपयशाचे कोणते मूळ कारण आहे ?
1.) योजनाबद्धता
2.) पैसा
3.) पैशाचा अभाव
4.) पैसा अथवा त्याचा अभ
Navodaya Admission Question Paper in Bengali
Navodaya Class 6 Question Paper in Bengali |
|
Year 2017 |
|
Year 2018 |
Math , Language |
Year 2019 |
Math , Language |
Year 2020 |
Math , Language |
Year 2021 |
Download |
Year 2022 |
Download |
FAQs:
- In which languages question paper is available in Meghalaya?
Answer. Students can choose and study in any of languages from English, Hindi, Garo, Khasi, Bengali and Assamese for JNVST exam.
- In which languages students of Andhra Pradesh can study for JNVST exam?
Answer. Students appearing in JNVST exam can choose any language from English, Hindi, Marathi, Telugu, Urdu, Oriya and Kannada.